Breaking News

जागतिक महिला दिनानिमित्त रायपूर येथे महिला आरोग्य तपासणी शिबिर

 जागतिक महिला दिनानिमित्त रायपूर येथे महिला आरोग्य तपासणी शिबिर

महा घडामोडी न्युज प्रतिनिधी नागपूर / हिंगणा - महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ गट कार्यालय 2 अंतर्गत आज दिनांक 8/3/2025 ला डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन रायपूर येथे जागतिक महिला दिनानिमित्त महिला आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले.या शिबीरात शालिनीताई मेघे होमिओपॅथी हॉस्पिटल वानाडोंगरी येथील डॉ विनोद खवसे वैद्यकीय अधिकारी,डॉ.अमृता क्षिरसागर वैद्यकीय अधिकारी डॉ.नयन दुरबळे, श्वेता सावरकर व यांची संपूर्ण टिम उपस्थित होती.

हेही वाचा : चंद्रपूर शहरात एका पोलीस कर्मचाऱ्याची हत्या

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शितलताई मुन , विशेष उपस्थिती दिपावलीताई कोहाड उपस्थित होत्या.या आरोग्य तपासणी मध्ये किडणी स्टोन,मुळव्याध, त्वचा रोग, पिंपल्स,ब्लड प्रेशर,शुगर,सिकलसेल,थॉयराईड, सौंदर्य व केस तक्रार,वजन कमी करणे किंवा वाढवणे, वातरोग, लहान मुलांचे आजार, स्त्रियांचे आजार यांसारख्या आजारांवर महिलांची तपासणी व होमिओपॅथीच्या औषधी द्वारे त्यांचे निवारण करण्याचे काम डॉक्टर करत आहे. 

हेही वाचा : इलेक्ट्रिक शार्टसर्किटमुळे जनावराच्या गोठ्याला आग सात जनावरे आगीमुळे होरपडून जागीच ठार

या शिबिरात एकुण 70 महिलांची तपासणी करण्यात आली.कार्यक्रम यशस्वीतेसाठी केंद्र संचालक हिंगणा सचिन रोडगे, दर्शन सोमकुवर केंद्र संचालक जयताळा, सामाजिक कार्यकर्ता शरद पाटील,वैशाली कोरडे,वृक्षवंती वरखडे,ऋषिता ईवनाते यांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत